विचार केला आज,खूप दिवस होऊन गेले,लिहिले नाही मी काही,आज मात्र असं,होता कामा नाही! काही तरी लिहूया आज,मनातली कल्पना शब्दात मांडूया,यमक जुळवता जुळवता,एक सुंदर छान शी,कविता रचुया! खूप उत्साहाने मी,लिहायला घेतले,पण डोकं काही चालेना,खूप विचार करून सुद्धा,शब्द काही उमलेना! शेवटी हताश झालो मी,मन माझे निराश झाले,प्रयत्न माझं झाले अपयशी,कारण,विषय मला सापडला नाही!
