बाप, ह्या दोन अक्षरी शब्दाचं महत्व समजणं सोपं नाही. बहुतेक वेळा आपल्या नकळत असे बरेच चांगल्या गोष्टी घडतात ज्यांच्या मागे आपले पिता असतात. आपण त्या गोष्टींच्या आनंदात इतके रमून जातो की हे कसं झालं हे बहुदा आपल्या लक्षातच येत नाही आणि आलं तरी उशिरा येतं. आपल्या माणसांना, आपल्या कुटुंबाला हवं-नको हे निरखुंपणे पाहत असतो आणि त्या गरजा पूर्ण कण्यासाठी झटत असतो. कित्यांदा स्वतःच्या गरजा त्याला त्याग करावा लागतात पण त्याची जाणीव मात्र तो आपल्याला होऊ देत नाही. समस्यांना लवकरात लवकर सामोरे जाऊन, ते निस्तरण्याचा प्रयत्न तो नेहेमी करतो ज्यानेकरून आपल्या परेंत अर्धे समस्या तर येतच नाही. अपणले आनंदी क्षण आणखी आनंदी कसे बनवता येतील ह्याची काळजी सुद्धा त्याला असते. स्वतःचं दुखणं मनात ठेऊन तो नेहेमी सर्वांना समोर हसत असतो. अश्या पितेचा आधार असणं हे कोणत्याही कुटुंबासाठी खूप मोठ्या गरजेचं असतं. ह्याच विषयाला मी #आधार_पितृत्वाचा ह्या कवितेच्या रुपात सादर केलं आहे!
