तुमच्यासाठी जगणे राहून गेलं

​आयुष्यात खूप काही कमावलं,खूप काही मिळवलं,पण तरी सतत वाटत गेलं,काही तरी राहून गेलं,​​जेव्हा केला विचार निरंतर,लक्षात आलं त्या नंतर,ज्यांनी ह्या जगात आणलं,त्यांचाच विसर पडला,कारण…आई-बाबा,स्वतःसाठी जगता जगता,तुमच्यासाठी जगणे राहून गेलं.

आयुष्य सुंदरच आहे

नको एवढा त्रास करू,थोडं सावर स्वतःला,हा काळ निघून जाईल,बस धीर धर जरा. माहित आहे मला,जे झालं ते योग्य नाही,पण एक लक्षात ठेव,संपून नाही गेलय सर्वकाही. मनाला समजव जरा,नीट बघ डोळ्यांनी,मनाला उज्वल कर,सकारात्मक विचारांनी. एक संधी गेली,दुसरी पुन्हा येईल,थोडी वेगळी असेल कदाचित,पण गमावलेले पुन्हा मिळवता येईल. चुका कोणा कडून होत नाही,सगळेच बरोबर नसतात ना,मग तू हीContinue reading “आयुष्य सुंदरच आहे”