अंधश्रद्धा दूर करु, ज्ञानाचा प्रकाश देऊ, खोट्या गोष्टींना फसून, आयुष्य नाही व्यर्थ करू! काळी मांजरे दिसली, संकट येते म्हणतात, पण ज्ञानाच्या मार्गावर, मन हे खुलं ठेवतात! चपला उलटं पडल्या, दुर्भाग्य काही नाही, अंधश्रद्धेत बुडलात, तर संकटं आल्या शिवाय राहत नाही! विना लिंबू-मिरची लटकवून, किंवा दारावर बांधता दोरी, फक्त मेहनतीने मिळतो, विजय चहुबाजूंनी! भितीच्या धाग्यांमध्ये, बांधूContinue reading “अंधश्रद्धेचा अंधार, ज्ञानाचा प्रकाश”
Category Archives: Marathi
प्रेमाची आशा!
शंकेची भिंत जेव्हा हळूहळू कोसळली, संशयाच्या सावटांनी जेव्हा जागा सोडली, विश्वासाच्या किरणाने हृदयाला वेढले. आपुलकीच्या उष्णतेने मन प्रफुल्लित झाले. तुमच्या हास्याने जे काही सांगितले, ते नजरेने ऐकले, हृदयाने ओळखले. तुमच्या नजरेतल्या गोडव्याने जे काही व्यक्त केले, ते मनाने सांगितले, आत्म्याने स्वीकारले. आता कोणतीही तक्रार नाही, कोणतीही खंत नाही, नाही नात्यात कोणताही दुरावा, कोणतीही अडचण नाही.Continue reading “प्रेमाची आशा!”
विषय मला सापडला नाही
विचार केला आज,खूप दिवस होऊन गेले,लिहिले नाही मी काही,आज मात्र असं,होता कामा नाही! काही तरी लिहूया आज,मनातली कल्पना शब्दात मांडूया,यमक जुळवता जुळवता,एक सुंदर छान शी,कविता रचुया! खूप उत्साहाने मी,लिहायला घेतले,पण डोकं काही चालेना,खूप विचार करून सुद्धा,शब्द काही उमलेना! शेवटी हताश झालो मी,मन माझे निराश झाले,प्रयत्न माझं झाले अपयशी,कारण,विषय मला सापडला नाही!
अभि(षेक)-मान(सी) ची शान
डिग्री घेऊन ते मुंबईत आले,पुढील शिक्षणाचं स्वप्नं रंगवायला,कल्पनाच नसेल त्यांना खरं तर,की ते आलेत, आयुष्यभराची गाठ बांधायला! एकाच वर्गात प्रवेश करून,एक मेकांशी ओळख झाली,दर रोज कॉलेज ला जाऊन,गाठी-भेटी वाढत गेली! त्यांचं छान ट्यूनिंग होऊ लागलं,काही महिने असेच निघून गेले,समजलेच नाही त्यांना कधी,मैत्रीच्या नात्याचे प्रेमात रूपांतर झाले! मैत्रीची बिय पेरून,त्याचं एक छान रोपटे झाले,त्या रोपट्याला एकContinue reading “अभि(षेक)-मान(सी) ची शान”
गोष्टी सतत बदलत राहणार
आज दिवस छान होता पण उद्या कदाचित नसेल,आज जेवढी मजा केली, ती आज पुरतीच असेल.. आज खूप आनंद मिळाला पण उद्या कदाचित दुःख मिळेल,क्षणा क्षणाचा महत्व, कधीतरी आपल्याला कळेल.. आज ती व्यक्ती अशी दिसते पण उद्या कदाचित वेगळी दिसेल,हा वेगळेपण आपल्यालाच, थक्क करून सोडेल.. आज अनेकांची साथ असेल पण उद्या कदाचित कोणीच नसेल,हा एकटेपणा आपल्याला,Continue reading “गोष्टी सतत बदलत राहणार”
आनंदाची दिवाळी
लखलखीत कंदील सोबत,आहे नक्षीदार रांगोळी;उटणेच्या सुवासात,होई अंघोळ सकाळी;नव – नवीन कपड्यांची,आहे गम्मत निराळी;शंकरपाळी, करंजी सोबत,आहे चिवडा फराळी;पणत्यांच्या प्रकाशात,काळोख सुद्धा उजळी;आपल्या सगळ्यांसाठी असू दे,ही आनंदाची दिवाळी…
७५ वर्ष स्वतंत्र तेचे
हा महोत्सव छोटा नाही,वेगळाच उत्साह आहे ह्या वेळीस,वेळ सुसाट सरकत चाललाय,ह्यावर आपला ताबा नाही! पण मात्र आज,७५ वर्ष केलेत पूर्ण,ह्या कालाधीत जे जे झालंय,त्याचा स्मरण करूया आज! सुरुवात कुठे केली,आणि आता कुठवर येऊन पोहोचलो,चांगले-वाईट असे दोन्ही दिवस बघितले,पण प्रगती सतत केली! गर्व करूया ह्या अमृत मातीचे,सन्मान ठेऊया त्याच्या प्रती,चला तर मग साजरा करूया,७५ वर्ष स्वतंत्रContinue reading “७५ वर्ष स्वतंत्र तेचे”
आधार पितृत्वाचा
बाप, ह्या दोन अक्षरी शब्दाचं महत्व समजणं सोपं नाही. बहुतेक वेळा आपल्या नकळत असे बरेच चांगल्या गोष्टी घडतात ज्यांच्या मागे आपले पिता असतात. आपण त्या गोष्टींच्या आनंदात इतके रमून जातो की हे कसं झालं हे बहुदा आपल्या लक्षातच येत नाही आणि आलं तरी उशिरा येतं. आपल्या माणसांना, आपल्या कुटुंबाला हवं-नको हे निरखुंपणे पाहत असतो आणि त्या गरजा पूर्ण कण्यासाठी झटत असतो. कित्यांदा स्वतःच्या गरजा त्याला त्याग करावा लागतात पण त्याची जाणीव मात्र तो आपल्याला होऊ देत नाही. समस्यांना लवकरात लवकर सामोरे जाऊन, ते निस्तरण्याचा प्रयत्न तो नेहेमी करतो ज्यानेकरून आपल्या परेंत अर्धे समस्या तर येतच नाही. अपणले आनंदी क्षण आणखी आनंदी कसे बनवता येतील ह्याची काळजी सुद्धा त्याला असते. स्वतःचं दुखणं मनात ठेऊन तो नेहेमी सर्वांना समोर हसत असतो. अश्या पितेचा आधार असणं हे कोणत्याही कुटुंबासाठी खूप मोठ्या गरजेचं असतं. ह्याच विषयाला मी #आधार_पितृत्वाचा ह्या कवितेच्या रुपात सादर केलं आहे!
माणसाचे मन
आणि म्हणूनच तथागत गौतम बुद्ध असे म्हणतात की आपण तेच बनतो जे आपल्या मनात, आपल्या विचारात असते. जर आपले मन पवित्र असेल तर आनंद एका सावली सारखा आपल्या सोबत चालत असतो!!
बुद्ध पूर्णीमेच्या अनेक अनेक शभेच्छा ☸️
आईच्या कुशीत
Happy Mother’s Day to all the mothers out there… ❤️
