अभि(षेक)-मान(सी) ची शान

डिग्री घेऊन ते मुंबईत आले,
पुढील शिक्षणाचं स्वप्नं रंगवायला,
कल्पनाच नसेल त्यांना खरं तर,
की ते आलेत, आयुष्यभराची गाठ बांधायला!

एकाच वर्गात प्रवेश करून,
एक मेकांशी ओळख झाली,
दर रोज कॉलेज ला जाऊन,
गाठी-भेटी वाढत गेली!

त्यांचं छान ट्यूनिंग होऊ लागलं,
काही महिने असेच निघून गेले,
समजलेच नाही त्यांना कधी,
मैत्रीच्या नात्याचे प्रेमात रूपांतर झाले!

मैत्रीची बिय पेरून,
त्याचं एक छान रोपटे झाले,
त्या रोपट्याला एक कळी उमळली,
आणि प्रेमाचं फुल फुलले!

ह्या फुलला,
समजुदारीचं खत-पाणी मिळत गेलं,
ह्या रोपट्याचे मूळ,
विश्वासाने निघट्ट होत गेलं!

मतभेद कोणाचे होत नाही,
त्याला थांबवणं अशक्य आहे,
मन-भेद त्यांचे झाले नाही,
हेच त्यांचे वैशिष्ठ आहे!

एम.टेक ची डिग्री घेऊन,
दोघे आप-आपला व्यवसाय करू लागले,
मुंबई आणि टोकियो चे अंतर,
मनाने कमी वाटू लागले!

कमी वाटणारे हे अंतर,
आता नाहीसे करायचे आहे,
पाच वर्षाच्या ह्या नात्याला,
आता अधिकृत करायचे आहे!

त्याकरिता आपण सारे,
इथे जमलो आहोत,
ह्या विवाह सोहळ्याचे,
आनंद घेत आहोत!

आयुष्याची पुढील वाटचाली,
एकमेकांसोबत ते आता करणार,
अभि-मान ची शान आता ते,
अशीच गाजवत राहणार!

Leave a comment