आज दिवस छान होता पण उद्या कदाचित नसेल,
आज जेवढी मजा केली, ती आज पुरतीच असेल..
आज खूप आनंद मिळाला पण उद्या कदाचित दुःख मिळेल,
क्षणा क्षणाचा महत्व, कधीतरी आपल्याला कळेल..
आज ती व्यक्ती अशी दिसते पण उद्या कदाचित वेगळी दिसेल,
हा वेगळेपण आपल्यालाच, थक्क करून सोडेल..
आज अनेकांची साथ असेल पण उद्या कदाचित कोणीच नसेल,
हा एकटेपणा आपल्याला, पाउलो-पाऊली नडेल..
आज उजेड आहे पण उद्या कदाचित काळोख राहील,
मनासारखं नेहमी होत नाही, हे आपल्याला समजुल जाईल..
आज गोष्टी जश्या आहेत पण उद्या कदाचित तश्या नसणार,
प्रत्येक गोष्टींची मर्यादा, काही काळच असणार..
आज हातात संधी असेल पण उद्या कदाचित निसटून जाणार,
पुरेपूर फायदा जर घेतला नाही तर, अर्ध्यावरच राहून जाणार..
हे सर्व नेहमी असेच होत राहणार,
कारण गोष्टी, ह्या सतत बदलत राहणार..
