
हा महोत्सव छोटा नाही,
वेगळाच उत्साह आहे ह्या वेळीस,
वेळ सुसाट सरकत चाललाय,
ह्यावर आपला ताबा नाही!
पण मात्र आज,
७५ वर्ष केलेत पूर्ण,
ह्या कालाधीत जे जे झालंय,
त्याचा स्मरण करूया आज!
सुरुवात कुठे केली,
आणि आता कुठवर येऊन पोहोचलो,
चांगले-वाईट असे दोन्ही दिवस बघितले,
पण प्रगती सतत केली!
गर्व करूया ह्या अमृत मातीचे,
सन्मान ठेऊया त्याच्या प्रती,
चला तर मग साजरा करूया,
७५ वर्ष स्वतंत्र तेचे…!
