आधार पितृत्वाचा हे समजणं सरळ नसतं,
कारण ते पुढून नाही तर मागून असतं,
जो खंबीरपणा वर दिसून येतो,
त्या पायाचा आधार पितृत्वाचा असतो,
साठवून ठेऊन स्वतःचं दुःख,
त्या कुटुंबीयांना लाभे आधार पितृत्वाचा सुख,
मनात रडूनी प्रेम मुलांवर करी,
आधार पितृत्वाचा असा दिसे उमलूनी,
असे हा प्रत्येक कुटुंबाचा श्वास,
कारण त्यात असे आधार पितृत्वाचा सहवास!
