आकाशात उंच भरारी घेऊन,
मला वाऱ्यात तरंगायचंय,
उडताना मला पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर,
मला हर्ष आणायचंय,
मांजेच्या माध्यमातून,
सतत तुझ्याशी जोडून राहायचंय,
फिरकी ची ढील घेऊन,
मला आणखी झेप घ्यायचीय,
काही असे क्षण अनुभवण्यासाठी,
मला पतंग व्हायचंय..
आकाशात उंच भरारी घेऊन,
मला वाऱ्यात तरंगायचंय,
उडताना मला पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर,
मला हर्ष आणायचंय,
मांजेच्या माध्यमातून,
सतत तुझ्याशी जोडून राहायचंय,
फिरकी ची ढील घेऊन,
मला आणखी झेप घ्यायचीय,
काही असे क्षण अनुभवण्यासाठी,
मला पतंग व्हायचंय..