आयुष्य कधी कोणतं वळणं घेईल
हे काही सांगता नाही येत;
आज घडलेल्या गोष्टींचा अर्थ भविष्यात उमजेल
ह्याची जाणीव ते उशिरा करून देत.
असाच एक प्रसंग मी सुद्धा अनुभवला,
जेव्हा एका सायंकाळी मला एक फोन कॉल आला;
कॉल करणारी व्यक्ती माझ्या परिचयाचीच होती,
पण हाच तो फोन कॉल ज्याने माझा पुढील आठवडा बदलून टाकला.
कॉल वर ती म्हणाली उद्या आम्ही सगळे भेटणार आहोत,
तर तू सुद्धा आम्हाला भेटशील का?
किती वर्ष झाले आपण सारे एकत्र भेटलोच नाही,
उद्याची संधी साधशिल का?
तिला हो बोलणं मला जड जात होते,
कारण माझी काही अडचण होती;
भले ही अडचणी सर्वांना असतात,
पण मला ही अडचण लवकरात लवकर सोडवायची होती.
पण का जणू मी होकार दिला,
इच्छा नसताना मला जावेसे वाटले;
पण हाच तर आयुष्याचा डाव होता,
ज्याने मला व्यवस्थित लपटले.
दुसऱ्यदिवशी मी त्यांना भेटायला गेलो,
सर्वांना भेटून खूप आनंद होत होता;
खूप जुन्या आठवणींची उजळणी झाली,
एकंदरीत वेळ मस्त जात होता.
बोलता बोलता ती माझ्या शेजारी आली,
मला एक अडचण आहे असे बोलू लागली;
मला ह्यावर काही उपाय सांग,
अशी मदत मागू लागली.
मी तिला म्हणालो,
माझी सुद्धा अशी-अशी अडचण आहे;
म्हणून मला मदत करणे शक्य नाही,
मला सुद्धा काही सुचत नाही आहे.
तिने मला विचारले काय झालं,
सर्व सांगितलं तिला मी;
त्यावर ती आधी बसली शांत,
आणि मग हसू लागली.
हसून ती मला बोलली,
मला एक जाणवलं आहे;
आपल्या दोघांची अडचण,
ही एक सारखीच आहे.
अश्यावेळी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे,
सतत कोणाशी तरी बोलत राहणे;
सतत कोणासोबत असणे,
कोणाचा तरी सहवास लाभणे.
मी इथे अजून एक आठवडा आहे,
त्यानंतर मी कामा-निमित्त दुसऱ्या शहरात जाईल;
तर ह्या पुढील आठवड्या मध्ये,
आपल्याला आपली समस्या दूर करता येईल.
आपण येत्या आठवड्यात,
एकमेकांशी सतत बोलत राहूया का?
आपली ही समस्या,
एकमेकांच्या मदतीने सोडवूया का?
मला कळत आहे,
हे कदाचित विचित्र दिसेल;
पण असं करणे,
आपल्याच फायद्याचं ठरेल.
बघ, तू नीट विचार कर,
आज रात्री पर्यंत सांग मला;
तुझ्या मनात जे काही असेल,
ते स्पष्ट बोल मला.
घरी आलो मी,
पण मन माझं तिथेच होतं;
मी किती नाकारलं तरी,
तिच्या बोलण्यात तथ्य होतं.
काही अडचणी अश्या असतात,
जे सहजा सुटत नाही;
म्हणूनच जसं काही निवारण मिळालं,
तर त्यावर अमल केल्याशिवाय राहिला जात नाही.
तरी मी ह्यावर विचार केला,
कारण हा एक करार च आहे;
जवळची नाही म्हंटले तरी,
ही माझी मैत्रीण च आहे.
अखेर माझा निर्णय झाला,
आणि मी तिला फोन केला;
ह्या करार बाबतीत मी तिला,
माझा होकार कळवला.
तर अशी ही नशीबाची बेत होती,
कालचा फोन कॉल फक्त एक निमित्त ठरलं;
काय माहित नव्हता मला,
ह्या येत्या आठवड्यात काय काय होणार होतं.
हीच तर खरी गंमत आहे,
आयुष्य हे कोडं च आहे;
बघू आता उद्या पासून,
अजून काय दडलं आहे!
