गुरू म्हणजे काय?

कठिण परिस्थितीतून मार्गदर्शन करणारा म्हणजे गुरू,
आयुष्यात लढ्याचा साहस देणारा म्हणजे गुरू.
आपले भविष्य उज्वल करणारा तो आपला गुरू,
अडथळ्यांना सामोरे जाण्याचे बळ देणारा म्हणजे गुरू.

कधी मानवी रूपात, कधी पुस्तकी रूपात शिक्षा देत असे,
तर कधी अनुभवातून, कधी वेळेनुसार देत असे!
मात्र शिक्षा देणे हाच एक ध्येय तो बाळगत असे,
त्याच्या प्रत्येक शिष्याला समानतेच्या नजरेने तो बघत असे.

शिक्षा देणे हे काही एवढे सोपे नव्हे,
पत्येकाला गोष्टी समजावून सांगणे हे काही पोरखेळ नव्हे.
तसेच प्रत्येकाला समजून घेणे हे सुध्दा सोपे नव्हे,
आणि ह्या जबाबदारी डावळणारा तो गुरू नव्हे.

मैत्री सारखे असे हे नातं आहे,
ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे हाच एक त्याचा नियम आहे.
आयुष्याच्या अनेक वाटचालीत त्याचा सहवास आहे,
गुरू-शिष्य हे नातं म्हणूनच तर खास आहे!

Leave a comment