सहन करून-करून इथवर मी आलोय,
ह्याहून जास्त आता काय मला सहन होईना,
सारे नुस्के वापरून आलोय,
आता ह्याच्याशिवय कोणताही पर्याय मला दिसेना!
अवघड असेल सारे हे माहीत आहे मला,
क्षणात सगळं गमावून बसेन,
हे सत्य पचवणं झेपणार नाही मला,
पण तरीही मी ते करेन!
कारण आता मागे वळणे शक्य नाही,
आणि ते मी करू तरी का?
आता हार मानायचा प्रश्नच नाही,
नाहीतर ह्या सगळ्याला अर्थ राहील का?
कधी-कधी गोष्ट नाही घडत हवी तशी,
अश्यावेळी थोडं सबुरीने घ्यायचं,
नको ते विचार खूप येतील डोक्याशी,
त्यांना बाजूलाच ठेवायचं!
