काळ तो वेगळाच होता,
शब्दात त्यांची व्याख्या काय सांगायची,
काय नाही सोसलं असेल त्या मानवाने,
ह्याची कल्पनाच काय करायची.
अख्खे आयुष्य ज्याने संघर्षच केला,
त्याने नीट पारख ठेवली वस्तुस्थितीची,
हेचं ते महामानव ज्यांनी सतत संदेश दिला,
माणसाला माणुसकी जपण्याची.
साऱ्याच गोष्टीने वंचित असून,
त्याने कधी जिद्द नाही सोडली,
पुस्तकांशी मैत्री करून ह्यांनी,
पदवी वर पदवी मिळवली.
भारताचा संविधान ह्यांनी लिहिला,
समानतेची चळवळ चालवली,
एक अनोळखी दूरदृष्टी होती,
भारताच्या ह्या विश्वरत्न ची.
