नको एवढा त्रास करू,
थोडं सावर स्वतःला,
हा काळ निघून जाईल,
बस धीर धर जरा.
माहित आहे मला,
जे झालं ते योग्य नाही,
पण एक लक्षात ठेव,
संपून नाही गेलय सर्वकाही.
मनाला समजव जरा,
नीट बघ डोळ्यांनी,
मनाला उज्वल कर,
सकारात्मक विचारांनी.
एक संधी गेली,
दुसरी पुन्हा येईल,
थोडी वेगळी असेल कदाचित,
पण गमावलेले पुन्हा मिळवता येईल.
चुका कोणा कडून होत नाही,
सगळेच बरोबर नसतात ना,
मग तू ही काय वेगळं केलंस,
तू ही माणूसच ना!
माफी द्यायला,
आधी पश्चाताप असू दे,
मग थोडी सुधारणा दाखव,
आणि मन मोकळं होऊ दे.
असा दिवस सुद्धा येईल,
हा विश्वास ठेव स्वतःवर,
बदल घडवायला वेळ लागतो,
जरा विचार कर ह्यावर.
आयुष्य संपवणे हा काही उपाय नाही,
ह्यातून तुझीच कमतरता दिसत आहे,
एक नेहेमी लक्षात ठेव की,
आयुष्य सुंदरच आहे…

Very nice Nishant, Keep writing.
LikeLiked by 1 person