सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं,
आमचं हे नातं नुकतंच सुरू झालं होतं.
तेव्हा विचार केला नव्हता एवढा,
पण मनातून मला ह्या नात्याला
एका नवीन level वर न्यायचं होतं!
जस-जसा संवाद वाढत गेला,
आम्हाला वेळ कमी पडत गेला.
आम्ही इतकं भेटायला लागलो की,
आमच्या प्रत्येक क्षण
Mesmerizing होत गेला!
रुसा-फुगी तर सर्व नात्यात होते,
त्यातूनच आणखी प्रेम निर्माण होते.
पण भांडणात इतरांची लुडबुड झाली
आणि मला कळालेच नाही की,
आमचं हे भांडण कोणीतरी enjoy करत होते!
तिचा प्रत्येक शब्द मला खरा वाटत होता,
म्हणून स्वप्नात संसार मांडला होता,
पण एक दिवस तिच येऊन
म्हणाली हे सगळं विसर वेड्या,
हा तर सारा timepass होता!

Wahh..
LikeLiked by 1 person
Hehe.. Thanks 😉
LikeLike