खूप प्रयत्न करतो आपण,
सगळं सांभाळून घेण्याचा,
जमेल तो प्रयास करतो आपण,
स्वतःला सावरुन घेण्याचा.
पण मनाने वैतागून जातो आपण,
हाती लागलेल्या अपयशाचा.
खचून जाऊ नकोस तू,
धीर धर जरा,
मनाला लावून घेऊ नकोस तू,
समजून घे जरा.
पण सत्याचा स्वीकार करच तू,
डोळे उघडून बघ जरा.
सतत हे आपण स्वतःला सांगत जातो,
मनाला काही हे पटेना,
विचारात आपण गुंतत जातो,
कोडं काही हे सुटेना.
पण कसं आपण सामोरे जातो,
आपल्याला आपलं कळेना.
सहन करायची एक क्षमता असते,
तोवर काही वाटत नाही,
वागण्याची एक पद्धत असते,
त्यापलीकडे काही सहन होत नाही.
पण किती काळ हे शक्य असते,
कारण सहन शक्ती चा अंत बघायचा नाही.
काहीच सारखं राहत नाही,
बदल हा होतच असतो,
आपल्याला तो आवडेलच असं नाही,
फक्त त्याचा स्वीकार करायचा असतो.
पण जे दिसत आहे तेच आहे असं नाही,
त्या मागे आपला दृष्टीकोन असतो.
अश्यावेळी डोकं शांत करणं असतं,
अवघड असलं तरी अशक्य नसतं,
परिस्थितीचा नीट विचार करणं असतं,
गडबडीत निर्णय घ्यायचं नसतं.
पण नशीब आपल्याशी खेळत असतं,
शांत राहणं आपल्याला जमत नसतं.
चुकामूक नेमकी अश्याच वेळी होते,
गोष्टी त्यामुळे भितरत जातात,
त्या चुकेची आपल्याला जाणीव होते,
नाती सुध्या पोखळ होत जातात.
पण हे असेच बरेच वेळा होते,
आणि नव्याने गोष्टी निर्माण होत जातात.
